Wednesday, August 11, 2010

वडगाव.. एक विलोभनीय परिसर..

दिवस होता रविवार, ढगाळ वातावरण आणि भटकंती करण्याची इच्छा. मग काय विचारता, केले मित्रांना फोन! पण सगळे आपापल्या कामात व्यस्त. :( आणि जर सोबत नसेल तर भटकंतीत काय मजा म्हणून मी बुलेटने जाण्याचं टाळल. गौराईने मला डब्बा पार्टी करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मग काय लगेच सगळे कामाला भिडले. गौराईने लगेच स्वयंपाक केला आणि डब्बे भरले. मी पद्माक्षला तयार केले आणि तासाभरात आम्ही भटकंतीसाठी तयार झालो.

फिरण्यासाठी जागा निवडली ती "वडगाव" (Wadgao). नागपूरपासून ४० km दूर चंद्रपूर रोडवर हे गाव आहे.

पण या जागेचा महत्व काय ?

तर मित्रहो, या गावामध्ये आहे, "पसायदान परिसर"(Pasaydan parisar), "वडगाव धरण"(Wadgao Dam) आणि "साहस कॅम्प"(Sahas Camp)

नकाशत दाखवल्या प्रमाने, बुटीबोरी नंतर वर्ध्याचा वळण न घेता सरळ रस्ता पकडला तर ५ km नंतर बोरखेडी गाव (Boarkhedi) डाव्या हाताला दिसेल (खूण : डाव्या हाताला दिसेल पाण्याची मोठी टाकी). डाव्या हाताला वळून सरळ गेल्यावर सर्वप्रथम पसायदान परिसर येईल. त्यासाठी तुम्हाला वळणापासून ८ km वडगाव धरणाकडे जावे लागेल. रस्ता फार रुंद नाही पण कार सहज जाऊ शकते.

पसायदान परिसर
पसायदान हा शब्द तुम्हाला अनोळखी नसेलच. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानाचा उल्लेख केलेला आहे. हा परिसर अतिशय रमणीय आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भव्य प्रतिमा इथे स्थापली आहे. प्रतिमेच्या खाली ध्यान मंदिर आहे जिथे तुम्ही ध्यान करू शकता. मूर्तीच्या आजूबाजूला छान झाडे लावली आहेत ज्याने तो परिसर अजून विलोभनीय वाटतो. नागपूरच्या माटेगावकर यांनी इथे छान किल्ल्यांच्या छोट्या रचना केलेल्या आहे. प्रतापगड, सिहगड, शिवेनेरी, इत्यादी गडांची प्रतिकृती माहितीसोबत इथे पाहायला तुम्हाला मिळेल. नागपुरला आल्यावर एकदातरी या जागी जरूर भेट द्यावी.

या जागेची एक झलक..
~~ ज्ञानेश्वर महाराजांची भव्य प्रतिमा ~~


~~ गडाची प्रतिकृती ~~


~~ गडाची प्रतिकृती ~~










वडगाव धरण
वडगाव धरणाचा परिसर सुद्धा तेवढाच सुंदर आहे. त्याची भव्यता तिथे जाऊनच लक्षात येते.
~~ भव्य वडगाव धरण ~~

साहस कॅम्प
साहस कॅम्प हा प्रहार संस्थेच्या अंतर्गत चालवण्यात येतो. हा कॅम्प Adventure sports साठी प्रसिद्ध आहे. परंतु इथे जाण्याकरता आधी संस्थेची परवानगी घ्यावी लागते.

आम्ही आणलेल्या जेवणाचा छान आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

तर मित्रहो, अशा या परिसरात कोणालाही आपला Weekend घालवायला व Enjoy करायला आवडेल. आम्ही पण आमचा Weekend असाच छान Enjoy केला. :-)

मग वाट कशाची बघताय .. येणाऱ्या Weekend ची ?? :p

4 comments:

  1. classic....nagpur and around seems so attractive with your photos and description!!

    ReplyDelete
  2. Shakal you are really doing fantastic job for people who like to do outing. Now whenever any one will ask me What is there in Nagpur for outing i would refer you blog to them. :) ..So keep adding about these beautiful places around Nagpur.

    ReplyDelete
  3. parisaar chngla aahe paan kille chukiche ahet

    ReplyDelete
  4. Sahas The Camp is not under Prahar.
    It's an independent organization managed by Mundle Education Trust. Pasaydan Parisar is also project of Mundle Education Trust

    ReplyDelete